महाराष्ट्र सरकारने 5 कोटींना मंडळाची इमारत लिलावात जिंकली; मराठी भाषा प्रचारासाठी मोठी पाऊलवाट
मुंबई | प्रतिनिधी – महाराष्ट्र सरकारने लंडनमधील महाराष्ट्र मंडळाची इमारत तब्बल ₹5 कोटींना लिलावात जिंकली असून, तेथे छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र उभारण्यात येणार आहे. उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयातील विधिमंडळ वार्ताहर कक्षात पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.हे केंद्र जगभरातील मराठी भाषेचे एक प्रमुख आंतरराष्ट्रीय केंद्र ठरेल. महाराष्ट्र हे असे वैश्विक भाषा केंद्र उभारणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली.
मराठी सातासमुद्रापार न्यायची”
मंत्री उदय सामंत म्हणाले,“मराठी भाषा आम्हाला सातासमुद्रापार न्यायची आहे. लंडनमध्ये 1 लाखाहून अधिक मराठी बांधव राहतात. त्यांच्या मुलांना भाषा शिकवण्यासाठी वर्ग, कार्यशाळा व विविध उपक्रम सुरू केले जातील. उद्योग विभागामार्फत रोजगार आणि गुंतवणुकीच्या संधी निर्माण होतील.”ते पुढे म्हणाले की, या इमारतीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले जाईल आणि एक-दोन महिन्यांत ती जागा ताब्यात घेतली जाईल. मराठी साहित्य, नृत्य, संगीत आणि सण-उत्सवांच्या माध्यमातून दोन्ही देशांतील सांस्कृतिक आदान-प्रदानाला यानिमित्ताने प्रोत्साहन मिळेल. मराठी भाषेच्या प्रचारासाठी भाषा वर्ग, कार्यशाळा आणि आंतरराष्ट्रीय परिषदा आयोजित करता येतील. तसेच, उद्योग, गुंतवणूक आणि शिक्षण क्षेत्रात नवीन संधी निर्माण होतील, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
-
महाराष्ट्र मंडळ लंडनची स्थापना 1932 मध्ये डॉ. एन. सी. केळकर यांनी केली.
-
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेही या मंडळाचे सभासद होते.
-
राष्ट्रभक्त मराठी लोकांनी 1989 मध्ये उदार देणग्यांद्वारे मंडळाने ही इमारत 99 वर्षांच्या लीजवर खरेदी केली होती.
-
सध्या हे मंडळ लंडन व परिसरातील 1 लाखाहून अधिक महाराष्ट्रीयनांशी जोडलेले आहे.
सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम
या केंद्रामुळे मराठी साहित्य, संगीत, नृत्य, सण-उत्सव यांच्या माध्यमातून दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक आदान-प्रदान वाढणार आहे. भाषा वर्ग, आंतरराष्ट्रीय परिषदा आणि कार्यशाळांच्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रचार व प्रसार होईल.
नवीन Appची घोषणाही
पत्रकार परिषदेत सामंत यांनी एमआयडीसीसाठी ‘मिलाप’ App जाहीर केले.
या अॅपमधून जमीन वाटप प्रक्रिया ऑनलाइन आणि पारदर्शक होईल.
ज्याला जागा हवी त्याला मोबाईलवर अर्ज करता येईल व 8 दिवसांत अलॉटमेंट लेटर मिळेल.
Maharashtra’s government has successfully acquired the Maharashtra Mandal building in London for ₹5 crore. The state plans to transform it into the Chhatrapati Shivaji Maharaj Global Marathi Language Centre.This initiative, confirmed by Industry and Marathi Language Minister Uday Samant, marks a significant step. Maharashtra is set to become the first Indian state to establish a dedicated global language center.

