Breaking
28 Oct 2025, Tue

राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड IPL 2026 आधी पदातून दूर

राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षक द वॉल राहुल द्रविड यांनी IPL 2026 आधीच फ्रँचायझी सोडल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. फ्रेंचायझीने त्यांना विस्तारलेली भूमिका ऑफर केली होती, पण द्रविडांनी ती स्वीकारली नाही, त्यामुळे त्यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाल आधीच संपला आहे. या निर्णयामागे फ्रँचायझीने केलेले ‘संरचनात्मक पुनरावलोकन’ हे प्रमुख कारण मानले जाते; कोणत्याही खेळाडूशी वाद याचा भाग नाही असे फ्रँचायझीने स्पष्ट केले आहे.2024 मध्ये भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर द्रविड राजस्थान रॉयल्समध्ये परतले होते.तेथून त्यांनी 2025 च्या हंगामात 14 पैकी केवळ 4 सामने जिंकले आणि संघ नवव्या स्थानावर उतरला, ज्यामुळे कामगिरी निराशाजनक ठरली. यामुळे पुढे भूमिकेत बदल करणे आवश्यक समजून फ्रँचायझीने द्रविड यांना मुख्य प्रशिक्षकाऐवजी विस्तारित भूमिका देण्याचा प्रयत्न केला, ज्याला त्यांनी स्पष्ट नकार दिला.पूर्वीच्या रिपोर्ट्सनुसार, द्रविड यांनी इतर काही आयपीएल संघांकडून “ब्लँक चेक” अवस्थेत ऑफर मिळाल्या, पण त्यांनी त्यांना नाकारून राजस्थान रॉयल्स निवडले होते, ज्यामागे 2011 पासून असलेली या संघाशी भावनिक आणि निष्ठेची नाळ होती. मात्र सद्य राजीनाम्यात कुठल्या विशिष्ट खेळाडूसंबंधित वादाचा उल्लेख नाही. मीडिया वर्तवलेल्या संजू सॅमसनशी असलेल्या मतभेदांवरही फ्रँचायझीने शांतता राखली असून ही चर्चा अफवा असल्याचे सांगितले आहे. मात्र पूर्ण सत्य लवकरच बाहेर येईल .अलीकडे राजस्थान रॉयल्स नवीन मुख्य प्रशिक्षक शोधण्याच्या प्रक्रियेत आहे. संजू सॅमसनच्या भवितव्याचेही निर्णय अजून घेणे बाकी आहे. तरी सध्याच्या निर्णयामागील मुख्य कारण संस्था आणि संघटनेच्या आतल्या सूचना तसेच ‘structural review’ असल्याचं निदर्शनास आलं आहे, ज्यामुळे द्रविड नी यातील प्रशिक्षण भूमिकेचा नकार दिला.

By Ruturaj Nalawade

Digital creator · Journalist · Writer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *