माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मोठा अपघात
जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत अपघात झाला. मिरवणुकीत सहभागी असलेल्या डीजे म्युझिक सिस्टीमने भरलेल्या ट्रकने ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले गेले त्यामुळे सात युवकांना धडक दिली. या दुर्घटनेत आदित्य काळे (२१) या युवकाचा मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.बुधवारी दुपारी जुन्नर शहरात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी डीजे सिस्टीम असलेली गाडी अचानक उतारावर ब्रेक फेल झाल्यामुळे पुढे असण्याऱ्या झांजा वाजवणाऱ्या पथकातील सात जणांना धडकली. यात आदित्य काळे (वय 21) याचा जागीच मृत्यू झाला. तो मिरवणुकीत झांज वाजवणाऱ्या पथकाचा भाग होता.
पोलिसांनी माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराम लांडे, त्यांचा मुलगा, डीजे ट्रकचा मालक आणि चालक अशा चार जणांना अटक केली आहे. अपघातानंतर लांडे आणि त्यांचा मुलगा घटनास्थळावरून पळून गेले होते, मात्र नंतर स्थानिक जमाव च्या मागणी नंतर त्यांना अटक केली गेली .अपघाताच्या प्राथमिक चौकशीत डीजे ट्रकचा ब्रेक फेल झाल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलिसस उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे यांनी सांगितले की, घटनास्थळी कायद्याप्रमाणे कारवाई होत आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून, मृताच्या नातेवाईकांनाही घटनेची माहिती देण्यात आली आहे.पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले .


