भारताचा पासपोर्ट आता अधिक प्रभावशाली ठरत आहे! हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 नुसार, भारताने ८५व्या स्थानावरून थेट ७७व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या यादीत भारताच्या नागरिकांना आता ५९ देशांमध्ये व्हीसा-फ्री किंवा व्हीसा ऑन अरायव्हल सुविधा मिळते.
यात मलेशिया, इंडोनेशिया, मालदीव, थायलंड या देशांचा समावेश आहे, तर श्रीलंका, म्यानमार आणि मकाऊ आगमनावर व्हीसा देतात. हे भारताचे आशियाई देशांशी अधिक मजबूत होत असलेले संबंध दर्शवतात.
सिंगापूरचा पासपोर्ट जगात सर्वाधिक ताकदवान ठरला आहे — त्यांच्या नागरिकांना तब्बल १९३ देशांत व्हीसा-फ्री प्रवेश आहे. दुसऱ्या क्रमांकावर जपान आणि दक्षिण कोरिया संयुक्तपणे आहेत, जेथे १९० देशांत प्रवेश शक्य आहे.
यंदा चीनचीही मोठी झेप पाहायला मिळाली — २०१५ मध्ये ९४व्या स्थानावर असलेला चीन आता ६०व्या स्थानी पोहोचला आहे. सौदी अरेबियानेही ४ नवीन देश जोडून ९१ देशांमध्ये व्हीसा-फ्री प्रवासाची सुविधा मिळवली आहे.
पारंपरिक महासत्ता असलेल्या अमेरिका (10व्या स्थानावर) आणि ब्रिटन (6व्या स्थानावर) यांची रँकिंग मात्र घसरली आहे, जे कठोर इमिग्रेशन धोरणे आणि भू-राजकीय बदलांचे संकेत देतात.
युरोपियन देशांमध्ये फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड, इटली आणि स्पेन हे देश व्हीसा-फ्री सुविधेत आघाडीवर असून १८९ देशांत त्यांना मोकळा प्रवेश आहे.

