मुंबई::मुंबईमधील पवईयेथील साकी विहार रोडवरील साई ऑटो ह्युंडाईच्या सर्व्हिस सेंटरला भीषण आग लागली. या आगीत कोट्यवधींच्या गाड्या जळून खाक झाल्या आहेत.सकाळच्या सुमारास मुंबईतील पवई येथे ह्युंडाईच्या सर्व्हिस सेंटरला आग लागली. या भीषण अग्नीतांडवात अनेक गाड्या जळून खाक झाल्या असून कोटीचे नुकसान झाले आहे. ही घटना घडताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले. या सेंटरला लागलेल्या आगीमुळे जवळच्या इमारतीतील रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातवरण पसरले होते. मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीमुळे त्या परिसरात धुरांचे मोठे लोट पसरले.
