शासन आपल्या दारी मोडमध्ये लाभ, सामाजिक व आर्थिक सुरक्षा बळकटीसाठी मोठा पाऊल

मुंबई | सप्टेंबर 12-13, 2025 – महाराष्ट्र सरकारने ‘मिशन वात्सल्य’ योजनेची व्याप्ती वाढवून राज्यातील सर्व विधवा, एकल आणि परित्यक्त्या महिलांना थेट शासकीय योजना मिळवून देण्याची घोषणा केली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
कोविड काळात अनाथ बालक आणि विधवा महिलांसाठी सुरू केलेली ‘मिशन वात्सल्य’ योजना आता सर्व विधवा, एकल व परित्यक्त्या महिलांपर्यंत विस्तारली जाईल. जिल्हास्तरावर शिबिरे आणि आऊटरीच कार्यक्रम राबवून कागदपत्रे व लाभ थेट महिलांपर्यंत पोहोचवले जातील, असे अधिकारी म्हणाले.
“मिशन वात्सल्यचा विस्तार महिलांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेला बळ देईल आणि राज्यातील सर्व एकल महिलांना दिलासा देईल,” – मंत्री आदिती तटकरे
कसे कार्य करेल
तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन केल्या जातील. या समित्या महिलांचे मृत्यू दाखला, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, रेशन कार्ड, निवारा, विधवा पेन्शन इत्यादी लाभ सुनिश्चित करतील.शिबिरांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून महिलांना ‘शासन आपल्या दारी’ मोडमध्ये प्रत्यक्ष लाभ मिळवून दिले जातील.योजनेच्या विस्तारामुळे राज्यभरातील महिला सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सुरक्षित होतील. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या उपक्रमामुळे संपूर्ण राज्यातील लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढून सामाजिक सुरक्षा जाळा अधिक मजबूत होईल.

