मुंबई होणार भारताची एंटरटेनमेंट कॅपिटल 50,000 कोटींची गुंतवणूक व 2 लाख रोजगार निर्माण करण्याचा राज्याचा संकल्प
मुंबई: महाराष्ट्र सरकारने ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिअॅलिटी (AVGC-XR) क्षेत्रासाठी देशातील पहिले व्यापक धोरण मंजूर केले आहे. हे धोरण मुंबईला जागतिक स्तरावर मनोरंजन आणि पर्यटनाची राजधानी बनवण्यासाठी व AVGC-XR धोरण 2025 केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नसून, राज्याच्या आर्थिक, शैक्षणिक आणि औद्योगिक वाढीच्या दृष्टिकोनातून एक मोठे पाऊल आहे.सध्या भारतातील AVGC-XR उद्योगात महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशातील तब्बल 30% म्हणजे 295 हून अधिक स्टुडिओ राज्यात कार्यरत आहेत. मुंबई आणि पुण्यात प्रशिक्षण संस्था व विशेष अभ्यासक्रम सुरू आहेत.नुकत्याच झालेल्या ‘व्हेव्ज 2025’ परिषदेत 8,000 कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या, ज्यामुळे उद्योगांना चालना मिळणार आहे.
AVGC-XR म्हणजे ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिअॅलिटी यांचा समावेश असलेला क्रिएटिव्ह तंत्रज्ञान क्षेत्र.
मुख्य वैशिष्ट्ये:
- AVGC-XR क्षेत्राला आता उद्योग व पायाभूत सुविधा क्षेत्राचा दर्जा, परिणामी 24×7 अत्यावश्यक सेवा आणि सातत्याने काम सुरू ठेवण्याचे स्वातंत्र्य.
- 3,268 कोटी रुपयांचा भव्य आराखडा, 2050 पर्यंतच्या दूरदृष्टीने तयार.
- येत्या 20 वर्षांत तब्बल 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 2 लाख नवीन रोजगार संधींना मूर्त स्वरुप.
- आज महाराष्ट्रात देशातील 30% म्हणजे तब्बल 295 हून अधिक स्टुडिओ आहेत, तर मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांत प्रशिक्षण आणि अभ्यासक्रमांसाठी विशेष संस्था कार्यरत आहेत.
भारतीय मीडिया आणि एंटरटेनमेंट बाजारपेठ 2030 पर्यंत 100 अब्ज डॉलरपर्यंत वाढेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. या क्षेत्रातून 30 लाख थेट आणि 51.5 लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होऊ शकतो.महाराष्ट्राचे धोरण या व्यापक दृष्टिकोनाशी सुसंगत असल्याचे अधिकारी सांगतात.गेल्या काही दशकांत आपली ओळख केवळ आर्थिक केंद्र म्हणून नव्हे, तर क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी आणि नवउद्योगासाठीही मुंबई आणि महाराष्ट्र बळकट करत आहेत. हे धोरण केवळ घोषणा न राहता, प्रत्यक्षात परीणामकारक ठरले तर येत्या दोन दशकांत महाराष्ट्र देशातीलच नव्हे तर जागतिक AVGC-XR केंद्र बनेल, यात शंका नाही.
या धोरणामुळे मुंबई केवळ बॉलीवूडची राजधानी नाही तर संपूर्ण डिजिटल एंटरटेनमेंट इकोसिस्टमची केंद्रस्थानी बनेल. हे धोरण महाराष्ट्राला जागतिक स्तरावर creative technology चे destination बनवण्यास मदत करेल.

धोरणातील महत्त्वाचे घटक:
- 2025-26 साठी 100 कोटी रुपयांची विशेष तरतूद, तर स्टार्टअप्ससाठी स्वतंत्र 300 कोटींचा फंड; स्थानिक उद्योजकांविषयी प्रोत्साहनाचा मनोदय.
- मुंबई फिल्म सिटी, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), कोल्हापूर आणि सातारा येथे ‘AVGC-XR पार्क्स’ उभारण्यात येणार, तेथे मोशन कॅप्चर, पोस्ट-प्रॉडक्शन लॅब, रेंडरिंग फार्म, साउंड रेकॉर्डिंग, आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील.

