Breaking
28 Oct 2025, Tue

भारताने चीनला 7-0 अशा फरकाने हरवत हॉकी आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये धडक

India vs China Hockey Asia Cup 2025: भारताचा 7-0 विजय, फायनलमध्ये कोरिया सामना

 बिहार :आपला राष्ट्रीय खेळ हॉकी मध्ये आपला संघ विजयी होतो तेव्हा जी वेगळीच अभिमानाची  भावना मनात  निर्माण होते  ती काही औरच असते ,भारतीय हॉकी संघाने चीनवर एकतर्फी वर्चस्व गाजवत 7-0 असा भव्य विजय मिळवून हॉकी आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये दमदार प्रवेश केला. सुपर-4 टप्प्यात झालेल्या या सामन्यात भारताचा सर्वांगीण खेळ चांगलाच  चमकला.सामन्यात आघाडीचे नेतृत्व अभिषेकने केले, त्याने दुसऱ्या अर्ध्यात दोन गोल (46’, 50’) करत विजय पक्का केला. याशिवाय शिलानंद लाकरा (4’), दिलप्रीत सिंग (7’), मनदीप सिंग (18’), राजकुमार पाल (37’) आणि सुखजीत सिंग (39’) यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाची बाजू अधिक मजबूत केली.पहिल्या सात मिनिटांत दोन जलद गोल करून भारताने सामन्यावर भन्नाट  नियंत्रण मिळवले. हार्दमनप्रीत सिंगच्या अचूक एरियल पासवर संघाचा पहिला गोल साकारला. तिसऱ्या आणि चौथ्या क्वॉर्टरमध्ये भारतीय आक्रमणाने चीनला कोणतीही संधी न देता सलग नॉनस्टॉप पाच गोल नोंदवले.भारतीय हॉकी महासंघानुसार, फायनल सामना 7 सप्टेंबर रोजी दक्षिण कोरियाविरुद्ध राजगीर, बिहार येथे सायंकाळी 7:30 वाजता IST होणार आहे.

“भारतीय खेळाडूंनी संपूर्ण सामन्यात शिस्तबद्ध बचाव आणि आक्रमक खेळ दाखवला,संघ म्हणून प्रत्येकांनी चांगला खेळ केला . फायनलसाठी ही कामगिरी संघाचा आत्मविश्वास वाढवणारी आहे,” असा अधिकृत अहवालात उल्लेख केला गेल आहे.

By Ruturaj Nalawade

Digital creator · Journalist · Writer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *