वृत्तसेवा -जसा इंटरनेटचा उपयोग वाढत आहे तसा सायबर क्राईम चा जोर वाढत आहे . थायलंड सीमेवरील KK Park सारख्या स्कॅम कम्पाउंडमध्ये अजूनही हजारो विदेशी मजूर जबरदस्तीने ऑनलाइन फसवणूक करण्यास भाग पाडले जात आहेत. थायलंड पोलिसांनी दिलेल्या अहवालानुसार, जवळपास १ लाख लोक अजूनही अशा ‘सायबर गुलामगिरी’त अडकले आहेत. या कम्पाउंडमध्ये अडकलेल्या विदेशी कामगारांना पकडणे, ताब्यात घेणे आणि त्यांच्या मायदेशी परत पाठवणे हे काम अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे..
मिळलेल्या माहितीनुसार पीडितांनी दिलेल्या माहितीनुसार, या कम्पाउंडमध्ये त्यांना अमानुष वागणूक दिली जाते. त्यांचे पासपोर्ट जप्त केले जातात, रोज १६ ते १८ तास जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडले जाते. या कामात खंड पडल्यास किंवा विरोध केल्यास विजेचे धक्के, मारहाण आणि शारीरिक छळ केला जातो. याशिवाय, त्यांच्या कुटुंबीयांकडून खंडणीही मागितली जाते.या स्कॅममध्ये अडकलेल्यांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय युवक आहेत. २०२० पासून “डेटा एंट्री” किंवा “डिजिटल मार्केटिंग”च्या आकर्षक आणि खोट्या जॉब ऑफर देऊन अनेकांना म्यानमारला नेण्यात आले. त्यानंतर त्यांना रोमॅन्स आणि क्रिप्टो स्कॅम चालवण्यास जबरदस्ती केली जाते.थायलंड, भारत, आणि इतर अनेक देश आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी बचाव मोहीम राबवत आहेत, पण या नेटवर्कची पाळेमुळे इतकी खोलवर रुजली आहेत की त्याला पूर्णपणे संपवणे अजूनही एक मोठे आव्हान आहे.
म्यानमारच्या करेन राज्यातील KK Park स्कॅम कम्पाउंड अजूनही “सायबर गुलामगिरी”चे केंद्र राहिले आहे. थायलंड पोलिसांच्या अहवालानुसार, सुमारे १ लाख लोक अजूनही अडकलेले असून, त्यांच्यावर जबरदस्तीने ऑनलाइन फ्रॉड ऑपरेशन्स चालवले जात आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघाने या परिस्थितीला मानवाधिकार संकट म्हणून वर्णन केले आहे. तज्ज्ञांच्या मते, फक्त छापे आणि सुटका पुरेशी नाही, तर या नेटवर्कचे वित्तपुरवठा, भरती एजंट्स आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर मोडणे गरजेचे आहे. सदर बातमी माहितीच्या आधारावर बनवली आहे . आपण विदेशात कामाला जाताना सुरक्षा व स्वतःच्या देशसच्या दूतावास याच्या नियमात काम केले पाहिजेन .

