अमळनेर – सततच्या पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असून , अमळनेर तालुक्यात आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात आला आहे. पिंपळे खु, पिंपळे बु, चिमनपुरी, मंगरूळ, आर्डी, शिरसाळे, अटाळे या परिसरातील शेतकरी सर्वाधिक नुकसन झाले आहेत. विशेषतः कपाशी आणि मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.कपाशीच्या झाडांमध्ये मुळसड, बुरशी लागणे आणि मर रोगाची सुरुवात झाली आहे. झाडांची मुळे कुजत असून पाने लालसर व मलूल होऊ लागली आहेत. तर सततच्या पावसामुळे मक्याच्या कणसांना कोंब फुटले असून उभे पीक आडवे पडू लागले आहे.
स्थानिक शेतकरी सांगतात की, “हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. शासनाने तातडीने सरसकट पंचनामे करावेत,” शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

