मुंबई :केवळ पुस्तकी ज्ञान नाही: इयत्ता पहिलीपासून कृषी शिक्षण, तरुणांना मिळणार परसबाग ते अन्न प्रक्रिया उद्योगाचे धडे
महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण पद्धतीत एक ऐतिहासिक आणि दूरगामी परिणाम करणारा बदल होणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षणाचा समावेश करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर केली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना केवळ पारंपरिक शेतीचीच नव्हे, तर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत क्रांती कशी करता येते, याचे धडे गिरवता येणार आहेत शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर या निर्णयाची घोषणा केली.
हा बदल शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून टप्प्याटप्प्याने लागू होईल. सुरुवातीला इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी “कार्य शिक्षण” या विषयांतर्गत कृषी शिक्षणाचा समावेश केला जाईल. त्यानंतर पुढील काही वर्षांत इयत्ता दहावीपर्यंत हा अभ्यासक्रम विस्तारला जाईल. हा निर्णय राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक नवी ऊर्जा देणारा ठरणार आहे.
📘 या उपक्रमामागील उद्दिष्ट
👉 नव्या पिढीची नाळ कृषी क्षेत्राशी जोडणे
👉 भारतीय संस्कृती, परंपरा व स्थानिक सण-समारंभ यांचा परिचय करून देणे
👉 तंत्रज्ञानाचा वापर वाढवून आधुनिक शेतीची जाण विद्यार्थ्यांना देणे
📚 अभ्यासक्रमातील प्रमुख विषय
इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अधिक व्यावसायिक आणि तंत्रज्ञानावर आधारित विषय शिकवले जातील. यात विशेषतः खालील घटकांचा समावेश असेल:
परसबाग व सेंद्रिय शेती
तृणधान्य उत्पादन आणि अन्न प्रक्रिया
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि बांबूचा वापर
कुक्कुट पालन व पाळीव प्राण्यांचे पोषण
पर्यटन आणि आदरातिथ्य
जल व्यवस्थापन व जैवविविधता नोंदणी
इंधनविरहीत स्वयंपाक

🌾 शिक्षण आणि रोजगाराला नवी दिशा
या बदलामुळे विद्यार्थ्यांना केवळ पारंपरिक शेतीबद्दलच नव्हे, तर AI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रातील वापर कसा करता येईल याचे प्रत्यक्ष ज्ञान मिळेल. यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि महाराष्ट्रातील कृषी क्षेत्र अधिक सक्षम होईल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.

