पुणे : पुणे शहराला हादरवून टाकणारी घटना विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नाना पेठेत गोविंद गणेश कोमकरवर तीन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असून , पोलिसांनी सांगितले. मृतक हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकरचा मुलगा होता.गोविंद कोमकर हा वनराज आंदेकरचा सख्खा भाचा होता. वनराज आंदेकर यांची 1 सप्टेंबर 2024 रोजी नाना पेठेत निर्घृण हत्या करण्यात आली होती. पोलिसांच्या मते, त्या हत्येमागे मुख्यतः कुटुंबीय व मालमत्ता विवाद होते.आंदेकर गटाचा रक्तरंजित इतिहास, पार्श्वभूमीतील वाद आणि टोळीयुद्धामुळे पुण्यात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 2023 मध्ये आंदेकर गटाने शुभम दहिभाते आणि निखील आखाडे यांच्यावर हल्ला केला होता, ज्यात निखीलचा मृत्यू झाला होता.पोलिस तपासात असेही समोर आले की संजीवनी कोमकरच्या दुकानाला पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईत पाडण्यात आले होते, ज्याची जबाबदारी तिने वनराजवर टाकली होती. यामुळे कुटुंबीयांमध्ये वाद वाढला आणि त्याचा परिणाम गोविंद कोमकरच्या हत्येत दिसून आला आहे ,गोविंद कोमकरची हत्या ही अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आंदेकर आणि गायकवाड टोळ्यांच्या संघर्षाचा एक भाग असल्याचे पोलिसानी सांगितले .
पोलीस प्रशासनाने संभाव्य हल्ले टाळण्यासाठी अनेक प्रयत्न केले, अगदी सप्टेंबर २०२५ मध्ये दत्ता बाळू काळे या आंदेकर गटाच्या सदस्याला अटक करून सोमनाथ गायकवाडच्या मुलावरील हल्ला उधळला होता. तरीही, गोविंद कोमकरची हत्या रोखता आली नाही.पुणे पोलिसांनी या प्रकरणात तातडीने गुन्हा नोंदवला असून तपास सुरू केला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

