सोलापूर | ५ सप्टेंबर २०२५ – ऐकावे कुणाचे कागदोपत्री नियमाचे की नामदार साहेबाचे असा काहीसा प्रकार करमाळा तालुक्यातील कुर्डू येथे बेकायदेशीर मुरूम उत्खननाविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि डीवायएसपी दर्जाच्या महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील कथित फोन वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेने राज्यात तीव्र राजकीय खळबळ उडवली आहे.पोलिस व महसूल पथक बेकायदेशीर उत्खनन थांबवण्यासाठी पोहोचले असता काही स्थानिक व पक्षकार्यकर्त्यांशी वाद झाला. याचवेळी एका स्थानिकाने अजित पवार यांना फोन केला आणि तो थेट अधिकाऱ्यांच्या हाती दिल्याचे समोर आले आहे . मिळालेल्या माहितीनुसार, अवैध मुरूम उत्खनन थांबवण्यासाठी पोलीस आणि महसूल विभागाचे संयुक्त पथक कुर्डू येथे पोहोचले होते. यावेळी काही स्थानिक कार्यकर्ते आणि पथकामध्ये वाद निर्माण झाला. याच वादादरम्यान, एका कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला आणि तो फोन महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना दिला. व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपमध्ये, पवार यांनी “कारवाई थांबवा” असे निर्देश दिल्याचा दावा केला जात आहे. तसेच, “हाउ डेअर यू” अशा कठोर शब्दांत त्यांचा संवादाचा सूर ऐकू येतो. मात्र, अधिकाऱ्यांनी ओळख पटवण्यासाठी स्वतःच्या नंबरवर कॉल करण्यास सांगितले असल्याचेही दिसते.या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. व्हायरल व्हिडिओनंतर स्थानिक प्रशासनाने घटनेची अधिक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजकारण्यांच्या कथित सहभागामुळे अशा प्रकरणांमध्ये कारवाई करणे प्रशासनासाठी एक मोठे आव्हान बनले आहे. माहिती पोलिसांनी दिली. व्हायरल व्हिडिओनंतर स्थानिक प्रशासनाने घटनेची अधिक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजकारण्यांच्या कथित सहभागामुळे अशा प्रकरणांमध्ये कारवाई करणे प्रशासनासाठी एक मोठे आव्हान बनले आहे.

