कृषी यंत्रसामग्री आणि बायोपेस्टिसाइड्सवरील जीएसटी कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा .
नवी दिल्ली: विविध कराच्या गुंतागुंतीतून बाहेर पडण्यासाठी भारतात १ जुलै २०१७ रोजी ‘एक राष्ट्र, एक कर’ या संकल्पनेवर आधारित वस्तू आणि सेवा कर (GST) लागू करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या ऐतिहासिक बैठकीत १२% व २८% करस्लॅब रद्द करून ५% व १८% स्लॅब लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन नियम २२ सप्टेंबरपासून लागू होतील, ज्यामुळे अनेक जीवनावश्यक वस्तू स्वस्त आणि काही लक्झरी वस्तू महाग होतील, असे अधिकार्यांनी सांगितले.सरकारचा हा निर्णय सर्वसामान्य नागरिकांना, मध्यमवर्गीय, शेतकरी आणि कामगारांना मोठा दिलासा देणारा आहे. या बदलामुळे अनेक वस्तू स्वस्त होतील. तथापि, तंबाखू आणि एनर्जी ड्रिंक्ससारख्या आरोग्यासाठी हानिकारक वस्तूंसाठी एक नवीन ४०% स्लॅब तयार करण्यात आला आहे.
प्रमुख बदल आणि परिणाम
जीएसटी कौन्सिलने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक उत्पादनांवरचा कर कमी होणार आहे. विशेषतः आरोग्य, कृषी आणि श्रम-केंद्रित उद्योगांना याचा फायदा होणार आहे. अनेक जीवनरक्षक औषधे आणि वैद्यकीय उपकरणांवरचा जीएसटी पूर्णपणे माफ करण्यात आला आहे.

स्वस्त होणाऱ्या वस्तू:
-
जीएसटी मुक्त: दूध, पनीर, पिझ्झा ब्रेड, रोटी, पराठा; ३३ जीवनरक्षक औषधे; महत्त्वाची आरोग्य उपकरणे.
-
५% स्लॅब (पूर्वी १२%): चष्मा व दृष्टीसंबंधी उपकरणे, काजू, बदाम, पिस्ता, खजूर, नारळ पाणी, सोया मिल्क, पॅकेज्ड फळ व दुधाच्या पेये, पास्ता, नूडल्स, कॉर्नफ्लेक्स, बिस्किटे, केक, पेस्ट्री, नमकीन, संगमरवरी व चामडे उत्पादने, कृषी यंत्रे, बायोपेस्टिसाइड्स, हँडीक्राफ्ट, ग्रॅनाईट ब्लॉक्स, लेदर गुड्स, आरोग्य व जीवन विमा पॉलिसी, ₹२५०० पर्यंत कपडे व शूज.
-
इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, इतर अनेक वस्तू.१८% स्लॅब (पूर्वी २८%)
-
महाग होणाऱ्या वस्तू: लक्झरी कार व बाईक (३५० सीसी+), तंबाखू, जर्दा, पान मसाला, फ्लेवर्ड पॅकेज्ड ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स. काही फ्रूट ड्रिंक्ससाठी ४०% स्लॅब आरोग्यास अपायकारक वस्तूंवर लागू.
-
शेतकरी व कामगारांसाठी दिलासा: कृषी यंत्रे,कीटकनाशके, नैसर्गिक मेंथॉल व श्रमप्रधान उद्योग (हँडीक्राफ्ट, संगमरवर, लेदर गुड्स) यांना कमी जीएसटीचा फायदा.
-
कपड्यांवरील बदल: आता ₹२५०० पर्यंतचे कपडे फक्त ५% स्लॅबमध्ये, पूर्वी ₹१००० पर्यंतचेच कपडे या स्लॅबमध्ये येत.गेल्या काही वर्षांत, जीएसटी कौन्सिलने विविध वस्तूंवरील करदरात बदल करून ही प्रणाली अधिक सुलभ व सोपी करण्याचा प्रयत्न सरकार कडून केला गेला आहे.


Best