दावणगेरे चन्नगिरी तालुका : कर्नाटकमधील नल्लूर गावात शेतकरी सय्यद नूर यांच्या घरी असलेल्या एका साध्या देशी कोंबडीनं अचानक निळ्या रंगाचं अंडं दिलं. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि पाहता पाहता आसपासच्या लोकांमध्ये कुतूहल निर्माण झालं. ज्याने त्याने फोटो काढून सोशल मीडियावर टाकले .गावकरी अंडं बघायला गर्दी करू लागले. स्थानिक मीडियानं ही गोष्ट टिपली असून व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
याविषयातील पशु विशेष अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपास करताना सांगितलं की हा निळा रंग अंड्याच्या कवचावर तयार होणाऱ्या biliverdin नावाच्या रंगद्रव्यामुळे येतो. साधारणपणे हा बदल कोंबडीच्या जाती-जनुकांमुळे होतो. आहार किंवा औषधांमुळे अंडं निळं होत नाही. 
तज्ज्ञ सांगतात की, जगात काही विशिष्ट जातींमध्ये उदा. Araucana, Ameraucana यामध्ये आरोउकाना, अमेरॉकाना आणि ईस्टर एगरचा समावेश आहे. निळसर-हिरवट अंडी दिसतात. देसी कोंबडीत असा बदल आल्यास ती दुसऱ्या जातीसोबत मिळाल्याची शक्यता असू शकते किंवा एखादा जनुकातील बदल असू शकतो.महत्त्वाचं म्हणजे, निळ्या कवचाचं अंडं पांढऱ्या किंवा तपकिर्या अंड्याप्रमाणेच खाण्यास सुरक्षित असतं. पोषणमूल्यात काही फरक नसतो.
गावकऱ्यांमध्ये चर्चा रंगतेय – “ही कोंबडी पुढं पण निळी अंडी घालणार का?” अधिकाऱ्यांनी सांगितलं की जर सातत्याने निळी अंडी पडली, तर याचा सखोल वैज्ञानिक तपास करता येईल. कोंबडीनं निळे अंडे दिल्याचा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. सय्यद नूर यांनी निळ्या अंड्यासोबत एक फोटो काढला होता. आता ते सर्व माध्यमामध्ये येत आहे.

