Breaking
28 Oct 2025, Tue

हरियाणाच्या वरिष्ठ IPS अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून घेतलं टोकाचं पाऊल – विभागात खळबळ

हरियाणाच्या पोलीस खात्यातून मंगळवारी धक्कादायक बातमी समोर आली. वरिष्ठ IPS अधिकारी वाय. पूरन कुमार यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना त्यांच्या चंदीगड येथील सरकारी निवासस्थानी घडली.
मृतदेह त्यांच्या मुलीने तळघरात रक्ताच्या थारोळ्यात पाहिला आणि तत्काळ पोलिसांना माहिती दिली.

घटनास्थळी पिस्तूल आढळलं, मात्र सुसाइड नोट मिळालेली नाही. फॉरेन्सिक पथक (CFSL) आणि चंदीगड पोलिसांनी जागेवर पंचनामा करून मृतदेह सेक्टर 16 रुग्णालयात पाठवला आहे.

2001 बॅचचे IPS अधिकारी वाय. पूरन कुमार हे हरियाणा पोलीस दलात प्रामाणिक, कार्यनिष्ठ आणि तडफदार अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडल्या होत्या.
त्यांच्या अकस्मात निधनाने पोलीस दल, प्रशासन आणि मित्रपरिवारात खळबळ आणि दु:खाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राथमिक तपास काय सांगतो

तपास तपशीलमाहिती
गनमॅनकडून शस्त्र घेतलेसोमवारी गनमॅनकडून पिस्तूल घेतले होते
घटनास्थळचंदीगड सेक्टर 11 येथील सरकारी निवास
सुसाइड नोटआढळलेली नाही
सीसीटीव्ही तपाससुरू असून फॉरेन्सिक पथकाने पुरावे गोळा केले
प्राथमिक निष्कर्षआत्महत्येचा प्राथमिक अंदाज, पण सर्व बाजूंनी तपास सुरू

चंदीगड पोलिसांनी सांगितले —

“पूरन कुमार यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही. आम्ही आत्महत्येचा कोन तपासत आहोत, परंतु इतर शक्यताही नाकारत नाही.”


IAS पत्नी सध्या जपान दौऱ्यावर

पूरन कुमार यांच्या पत्नी अमनीत पी. कुमार या हरियाणा केडरच्या 2001 बॅचच्या IAS अधिकारी असून सध्या नागरी उड्डाण विभागाच्या आयुक्त व सचिव आहेत.
घटनेच्या वेळी त्या मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत जपान दौऱ्यावर होत्या.

मुलीने पाहिला वडिलांचा मृतदेह

पूरन कुमार यांच्या मुलीने दुपारी वडिलांना तळघरात पडलेले पाहिले. ती धावत बाहेर आली आणि शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना कळवले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली, पण गोळी डोक्यात लागल्याने जागीच मृत्यू झाला होता.हरियाणाच्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये या घटनेमुळे खोल दु:ख आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्यांना “निष्ठावान, नम्र आणि कर्तव्यदक्ष अधिकारी” म्हणून आठवले.
पूरन कुमार यांनी पोलीस प्रशिक्षण महाविद्यालय, सुनारिया येथे ADGP म्हणून काम करताना अनेक नवे प्रशिक्षण उपक्रम सुरू केले होते

सखोल तपासानंतर उघड होईल सत्य

फॉरेन्सिक आणि तांत्रिक तपास सुरू असून पोलिसांकडून कुटुंबीय, कर्मचारी आणि गनमॅनचे जबाब नोंदवले जात आहेत.
सध्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट असलं तरी वैयक्तिक ताण, मानसिक दडपण किंवा वैयक्तिक परिस्थिती यांचा शोध घेतला जात आहे.

#Gramshasan #HaryanaPolice #IPSPuranKumar #ChandigarhNews #PoliceSuicide #LawAndOrder #IndiaNews

By Ruturaj Nalawade

Digital creator · Journalist · Writer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *