Breaking
28 Oct 2025, Tue

मुंबईत गणपती विसर्जनाचा उत्साह शिगेला; लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी.

 मुंबई: भक्तिमयरस आज, अनंत चतुर्दशीच्या दिवशी, संपूर्ण मुंबई शहरात गणपती विसर्जन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरू आहे. पावसाच्या सरी कोसळत असूनही भाविकांचा उत्साह जराही कमी झालेला नाही. डीजे  ढोल-ताशांच्या गजरात, नाचत-गाजत आणि “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या जयघोषात घरगुती आणि सार्वजनिक गणपती मूर्तींचे विसर्जन होत आहे. सगळीकडे आनंदमय  वातावरण आहे .

                                                      लालबागच्या राजाची शाही मिरवणूक:मुंबईतील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय ‘लालबागचा राजा’ याची शाही विसर्जन मिरवणूक मोठ्या थाटामाटात निघाली आहे.विशेषतः, श्रॉफ बिल्डिंगसमोर हजारो भाविकांनी राजावर पुष्पवृष्टी केली. या वर्षी राफेल विमानाची प्रतिकृती वापरून फुलांचा वर्षाव करण्यात आला.व विसर्जन मिरवणूक पुढे  गेली .

                                                     चौपाटीवर भाविकांची गर्दी:गिरगाव आणि जुहू चौपाटीवर सकाळपासूनच मोठ्या मिरवणुका दाखल होत आहेत.’सुतारवाडीचा बाप्पा राजा’ आणि ‘कामाठीपुरा’ यांसारख्या प्रसिद्ध मंडळांचे गणपती गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी पोहोचले आहेत. सागरात जनसागर सामावला असून बाप्पा च्या  आरत्यांनी  सगळीकडे निनाद पसरला आहे .

                                                पर्यावरणाची काळजी: मुंबई महानगरपालिकेने (BMC) यंदा विक्रमी 205 कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे, जेणेकरून विसर्जन पर्यावरणपूरक होईल.नियमांनुसार, सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावांमध्येच केले जात आहे. त्यापेक्षा मोठ्या मूर्तींचे विसर्जन समुद्रात पालिकेच्या देखरेखीखाली होत आहे.या वर्षी 12,000 हून अधिक सार्वजनिक मंडळांनी शाडूच्या पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर करण्यास प्राधान्य दिले आहे.

                                                   सुरक्षेची चोख व्यवस्था: गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई पोलीस दलाने शहरात 21,000 हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त ठेवला आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले असून, सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे गर्दीवर लक्ष ठेवले जात आहे.

                                                      मुख्यमंत्र्यांनी दिला निरोप: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर आपल्या कुटुंबासह गणपतीची उत्तरपूजा करून कृत्रिम तलावात विसर्जन केले. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शाह उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या शांतता आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली आणि शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन करण्याचे आवाहन केले.

By Ruturaj Nalawade

Digital creator · Journalist · Writer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *