ओतूर — चांगल्या दरांची आस धरून शेतकऱ्यांनी आपल्या चाळीत साठवून ठेवलेला कांदा आता सडू लागला आहे. त्याच वेळी बाजारात कांद्याचे भाव कोसळत चालले आहेत. या दुहेरी मारामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.भाव वाढतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी आपला कांदा घरी साठवून ठेवला होता. पण आता तो सडू लागला आहे आणि बाजारातही दर पडत चालले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी तोटा सहन करावा लागत आहे.आधीच नाही भाव त्यात चोरीचा घाव जुन्नर तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतातून २२ पिशव्या कांद्यांची चोरी झाली आहे. या चोरीची फिर्याद त्यांनी ओतूर पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. चोरी गेलेल्या कांद्यांची एकूण किंमत ₹ १३,२०० इतकी आहे
विकास मारुती वाघचौरे (४८) सांगितले की , १६ सप्टेंबरला त्यांनी कांदा काढून आहिनवेवाडी रोड, वाघचैरे मळा येथील आपल्या शेतातील चाळीत साठवून ठेवला होता. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन पाहिलं तर कांद्याच्या पिशव्या कमी झाल्या असल्याचे लक्षात आले तसेच अनेक पिशव्या इकडे तिकडे पडल्या होत्या.अंदाजे चोरी १६ सप्टेंबर संध्याकाळी ५ वाजेपासून १७ सप्टेंबर सकाळी ७ वाजेपर्यंत झाली असावी . या प्रकरणी एफआयआर क्र. ०२९२/२०२५ दाखल करण्यात आला आहे आणि हा गुन्हा भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत नोंदविण्यात आला आहे.असे ओतूर पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक लहू गौतम ठाते यांनी सांगितले. या तपासाची जबाबदारी पोलीस हवालदार आनंद कोंडीराम भवारी यांना दिली आहे.
यापूर्वीही पुणे ग्रामीण भागात शेतमालाच्या चोरीच्या घटना झाल्या आहेत. कांदा, भाजीपाला आणि इतर नाशवंत पिकांच्या चोरीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या पिकांच्या सुरक्षेबद्दल काळजी व्यक्त करत आहेत.

